Home हिंदी महा मेट्रो । त्रिमूर्ती नगर एनआयटी उद्यानात झाला मेट्रो संवाद

महा मेट्रो । त्रिमूर्ती नगर एनआयटी उद्यानात झाला मेट्रो संवाद

620

 

स्थानिक नागरिकांची मागणी- त्रिमूर्ती नगर भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत फिडर सर्विस उपलब्ध व्हावी

नागपूर ब्यूरो : मेट्रो तर्फे पहाटे 6 वाजता ऍक्वा लाईन मार्गिकेवरील त्रिमूर्ती नगर येथील एनआयटी उद्यान या परिसरातील माणसांनी तुडुंब भरलेले असते. कोणी व्यायाम करायला, कोणी योगासनासाठी तर कोणी नुसतंच चालायला म्हणून या बागेत येत असतात. महा मेट्रो नागपूरच्या सिटीझन कनेक्टिव्हिटी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मेट्रो अधिकाऱ्यांनी आज या उद्यानात उपस्थित होऊन येथील नागरिकांसमवेत मेट्रो संवाद हा कार्यक्रम घेतला.

उपस्थित नागरिकांना नागपूर मेट्रोबद्दल प्राथमिक माहिती दिल्यानंतर त्या भागातील नजीकचे मेट्रो स्टेशन तसेच उपल्बध सेवा जसे कि सेलिब्रेशन ऑन व्हील्स,फिडर सेवा,मेट्रो ट्रेन मध्ये सायकल सोबत नेण्याची सोय व महा कार्ड संदर्भात माहिती देण्यात आली तसेच पर्यावरण पूरक परिवहन साधनाचा उपयोग करण्याकरिता प्रोत्साहन करण्यात आले.त्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सरतेशेवटी बऱ्याच नागरिकांनी त्यांचे माझी मेट्रोबद्दलचे मनोगत उत्साहात व्यक्त केले तसेच स्थानिक नागरिकांनी त्रिमूर्ती नगर भागातून फिडर सर्विस सेवा वासुदेव नगर तसेच सुभाष नगर मेट्रो स्टेशन पर्यंत सुरु व्हावी जेणेकरून आमच्या सारखे सिनियर सिटीझन कुठल्याही अडथळ्याविना सहज पणे मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचून पुढील प्रवास करू अशी मागणी मेट्रो अधिकाऱ्यांना केली.

या ठिकाणी त्रिमूर्ती नगर परिसरातुन मोठ्या प्रमाणात नागरिक सिताबर्डी, वर्धा मार्ग तसेच हिंगणा मार्गावर दररोज ये जा करत असून या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. मेट्रो स्थानकाशी या परिसराला जोडून जास्तीत जास्ती नागरिकांना मेट्रो रेलशी जोडण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).