नागपूर ब्यूरो : नागपुरातील उद्योन्मुख कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध करून देत त्यांच्या उपजत कलेला वाव देण्याकरिता महा मेट्रो आणि सूर संगम तर्फे संयुक्त रित्या आज संगीताचा कार्यक्रम सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर आयोजीत करण्यात आला. गाण्याच्या या मेजवानीला नागपूरकर रसिकांनी चांगलीच दाद देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या या संगीत उत्सवाचा शहरातील संगीत प्रेमी, ज्येष्ठ नागरिक तसेच मेट्रोच्या प्रवाश्यांनी देखील आनंद लुटला.
सचिन आणि सुरभी ढोमणे या शहरातील नामांकित जोडीने आपल्या इतर कलाकारांसह सुमारे एक तास हा कार्यक्रम रंगवला. महत्वाचे म्हणजे शहरातील उद्योन्मुख कलाकारांना यात वाव देण्यात आला.
हिंदी आणि मराठी गाण्यांची बहारदार मेजवानी या निमित्ताने रसिकांना मिळाली. देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत तसेच सुगम संगीतावर आधारित गीतं या कार्यक्रमात सादर करण्यात आली. सचिन आणि सुरभी ढोमणे शिवाय या कार्यक्रमात मंगेश देशपांडे, श्रिया मेंढी, रिषभ ढोमणे यांनी देखील सादरीकरण केले.
या कार्यक्रमाकरिता सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर विशेषत्वाने बँड स्टॅन्ड तयार करण्यात आला आहे. असेच बँड स्टॅन्ड मेट्रो च्या अन्य स्टेशनवर देखील स्थापित करण्याचा महा मेट्रोचा प्रयत्न आहे. नागपूरच्या सूर संगम ग्रुपने मेट्रो मध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्या संबंधीचे पालकत्व घेतले आहे.
नागपुरातील ज्या कलाकारांना कार्यक्रम सादर करायचे आहे त्यांनी या करता महा मेट्रोशी किंवा सूर संगम च्या कलाकारांशी संपर्क साधावा असे आवाहन महा मेट्रो तर्फे केले जात आहे. नागपूरकरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील महा मेट्रोने केले आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).