नागपूर ब्यूरो : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजता विभागातील 322 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहिती नुसार दूपारी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली.
दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये जिल्हानिहाय झालेले मतदान नागपूर 53.91, भंडारा-57.77, चंद्रपूर-54.16, गोंदिया-50.80, गडचिरोली-40.54, वर्धा-57.59 टक्के असे एकूण 53.64 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली. नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. आज सकाळी झालेल्या मतदानात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मतदान केले. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत असून विभागात 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).