• विभागात 1 लाख 32 हजार 923 मतदान
• मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होणार मतमोजणी
• मतमोजणीसाठी 7 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
• एकूण 279 अधिकारी – कर्मचारी नियुक्त
• विभागात सरासरी 64.38 टक्के मतदान
नागपूर ब्यूरो : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार, दिनांक 3 डिसेंबरला सकाळी 8 वाजेपासून मानकापूर येथील क्रीडा संकुलात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेची रंगीत तालीम बुधवार ला घेण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संजीव कुमार यांच्यासह विभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उपस्थित होते. पदवीधर निवडणुकीत काल झालेल्या मतदानात 64.38 टक्के एवढे मतदान झाले आहे. विभागात 322 मतदान केंद्रावर काल 1,32,923 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 19 उमेदवारांमध्ये लढत आहे.
अशी असेल मतमोजणी
- विभागीय क्रीडा संकुलात चार हॉलमध्ये प्रत्येकी सात अशा एकूण 28 टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. त्या प्रत्येक टेबलवर काऊंटींग सुपरव्हायजर म्हणून एक उपविभागीय किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून दोन तहसीलदार आणि एक लिपिक असेल.
- या मतमोजणी प्रक्रियेत 28 टेबलवर नियुक्त मोजणी अधिका-यांव्यतिरिक्त तीन ते चार राखीव टीम असतील. चारही हॉलमध्ये प्रत्येकी एक रो ऑफिसर आणि एक अतिरिक्त अधिकारी असेल.
- त्याशिवाय पोस्टल बॅलेटमधील मतमोजणीसाठीसुद्धा 10 ते 12 अधिकारी तसेच कर्मचा-यांची मिळून एक टीम असेल. सर्व मतपत्रिका एकत्रित करुन त्याचे प्रत्येकी 25 याप्रमाणे 40 गठ्ठे तयार करुन एक हजार मतांचे गठ्ठे बनविले जाईल.
- त्यानंतर ते गठ्ठे एकत्र मिसळले जातील. त्यानंतर सरमिसळ केलेले गठ्ठे प्रत्येक टेबलवर वितरीत केले जातील. त्याठिकाणी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.
- 28 हजार मतपत्रिकांची एक फेरी राहील. अशा रितीने एकूण मतदान 1 लाख 32 हजार 923 असून, मतमोजणीच्या साधारणत; 4 ते 5 फे-या होतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
मतदानाची टक्केवारी 64.38 टक्के
पदवीधर मतदार संघात 1 डिसेंबरला झालेले मतदानाची एकूण टक्केवारी 64.38 असून 69.41 पुरुष मतदार तर 56.62 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाची जिल्हास्तरीय पुरुष व महिला मतदारांची टक्केवारी अशी आहे. नागपूर जिल्हयात पुरुष मतदार 66.27 तर महिला उमेदवार 54.29 व इतर 16.67 असे एकूण मतदान 60.88 टक्के आहे. भंडारा जिल्हयात पुरुष मतदार 76.06 तर महिला उमेदवार 65.28 असे एकूण मतदान 72.56 टक्के आहे. गोंदिया जिल्हयात पुरुष मतदार 68.07 तर महिला उमेदवार 54.80 असे एकूण मतदान 63.68 टक्के आहे. वर्धा जिल्हयात पुरुष मतदार 71.10 तर महिला उमेदवार 56.35 असे एकूण मतदान 65.32 टक्के आहे. चंद्रपर जिल्हयात पुरुष मतदार 71.07 तर महिला उमेदवार 60.10 व इतर 20.00 असे एकूण मतदान 67.47 टक्के आहे. गडचिरोली जिल्हयात पुरुष मतदार 74.95 तर महिला उमेदवार 65.61 असे एकूण मतदान 72.37 टक्के आहे.
पदवीधर मतदार संघात संख्येवारीनुसार एकूण 1 लाख 32 हजार 923 इतके मतदान झाले असून असून 87 हजार 68 पुरुषांनी तर 45 हजार 849 महिला मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला आहे. जिल्हानिहाय मतदान नागपूर-62585 पुरुष-37499 तर महिला 25081 मतदार व इतर 5 मतदार आहेत. भंडारा -13375 पुरुष-9462 तर महिला 3913 मतदार आहेत. गोंदिया -10783 पुरुष-7712 तर महिला 3071 मतदार आहेत. वर्धा -15069 पुरुष-9986 तर महिला 5083 मतदार आहेत. चंद्रपूर-22103 पुरुष-15658 तर महिला 6444 मतदार व इतर 1 मतदार आहेत. गडचिरोली -9008 पुरुष-6751 तर महिला 2257 मतदार आहेत.
या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी(रिपब्लीक पार्टी ऑफ इंडीया), इंजीनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे(अपक्ष), अमीत मेश्राम(अपक्ष), प्रशांत डेकाटे (अपक्ष), नितीन रोंघे (अपक्ष), नितेश कराळे (अपक्ष), डॉ.प्रकाश रामटेके(अपक्ष), बबन ऊर्फ अजय तायवाडे (अपक्ष), ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफफार (अपक्ष), सिए. राजेद्र भुतडा, .डॉ. विनोद राऊत (अपक्ष), ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल, शरद जीवतोडे (अपक्ष) , प्रा.संगीता बढे(अपक्ष), इंजीनियर संजय नासरे(अपक्ष), या उमेदवारांचा समावेश आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).