नागपूर ब्यूरो : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज गुरुवार, दिनांक 3 डिसेंबरला मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.
सुरवातीला टपाली मतमोजणी करण्यात येत आहे. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी मतमोजणीच्या गोपनीयतेची सूचना सर्वांना दिली. यावेळी सर्व उमेदवारांचे आणि पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आजच्या मतमोजणी प्रक्रियेत 4 हॉलमध्ये प्रत्येकी 7 अशा एकूण 28 टेबलवर मतमोजणी करण्यात येत आहे. प्रत्येक टेबलवर काऊंटीग सुपरव्हायजर म्हणून एक उपविभागीय किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी कार्यरत असून मदतनीस म्हणून 2 तहसीलदार आणि 1 लिपिक कार्यरत आहे. सध्या टपाली मतमोजणी सुरू आहे.
सकाळी 10. 30 वाजे पर्यंत टपाल पत्रिकेसह एकूण मतदान असलेल्या 1 लाख 32 हजार 928 मतपत्रिका एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतरच प्रत्यक्ष मतमोजणी ला सुरुवात होईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
आजच्या मतमोजणीची सुरवात होतांना पदवीधर निवडणुकीसाठी निरीक्षक एस. वी. श्रीनिवास व विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार विभागातील सहा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित आहेत. नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकित 19 उमेदवार रिंगणात आहेत.64.38 टक्के एवढे मतदान झाले आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).