Home हिंदी रक्तदानाची ऑफर । रक्तदात्यास मिळेल चिकन आणि पनीर

रक्तदानाची ऑफर । रक्तदात्यास मिळेल चिकन आणि पनीर

686

शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केले आहे महारक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई ब्यूरो : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचे सांगत जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. नागरिकांना निरनिराळ्या भेटवस्तू देऊन रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ते करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभादेवीमध्ये रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना एक किलो चिकन, तर शाकाहारी व्यक्तींना पनीर देण्यात येणार असल्याची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरू आहे.

13 डिसेंबर रोजी माहीम-वरळी विधानसभा क्षेत्रात शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे.

त्यांनी रक्तदान करणाऱ्या लोकांना चिकन आणि पनीर देण्याचे ऑफर दिले आहे. सध्या ही ऑफर सोशल मीडिया मध्ये चर्चेचा विषय झालेला आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).