नागपूर ब्यूरो : हेमलकसा येथील समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या पत्नी समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे आणि मुलगा अनिकेत आमटे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अनिकेत आमटे यांनी स्वत:च सोशल मीडियावर ही माहिती दिली. दोघांनीही आरटीपीसीआर टेस्ट केली होती. सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या आम्हाला कुठलाही त्रास नाही. मात्र गेल्या काही दिवसांत आमच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असेही अनिकेत आमटे यांनी म्हटले आहे.
कुष्ठराेग्यांसाठी काम करणाऱ्या महारोगी सेवा समिती आनंदवन (वरोरा) येथील डॉ. विकास आमटे यांची मुलगी डॉ. शितल आमटे-करजगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी डॉ. प्रकाश आमटे कुटुंबीय आनंदवनला गेले होते. तेथून हेमलकसा आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता, दोघे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे लोकबिरादरी प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. प्रकल्पातील चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा प्रकल्प डिसेंबर महिन्यापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रकल्प व्यवस्थापनाने घेतला होता.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).