इलेक्ट्रीक फिडर सर्विसचा मेट्रो स्टेशन येथून शुभारंभ
नागपूर ब्यूरो : जास्तीत जास्त नागरिकांनी नागपूर मेट्रोचा वापर करावा या करता महा मेट्रो तर्फे नवीन योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असून प्रवाश्यांचा याला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशन च्या सदस्यांनी मेट्रो आणि फिडर सर्विसचा उपयोग करून ग्रीन डे साजरा केला. यामध्ये 100 हुन जास्त मॅन्युफॅचर असोसिएशन च्या सदस्यांनी सिताबर्डी इंटरचेंज येथून एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास केला.
एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथून नागपूर महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक बसला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ देखील या प्रसंगी करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अशोक खरे, एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, महा मेट्रोचे महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, सह महाव्यवस्थापक महेश गुप्ता तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अशोक खरे: पर्यावरणपूरक वाहतूक सेवेचा वापर करून प्रदूषण मुक्त शहर ठेवण्यास मदत करावी असे आवाहन यावेळी अशोक खरे यांनी नागरिकांना केले.
एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशन अध्यक्ष श्री. प्रदीप खंडेलवाल: बुटीबोरी पर्यंत फिडर सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल महा मेट्रोला धन्यवाद दिले. महा मेट्रो व नागपूर महानगर पालिकेनी पुढाकार घेऊन या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बुटीबोरी येथील कर्मचाऱ्यांना याचा निश्चित लाभ होणार आहे असे मत प्रदीप खंडेलवाल यांनी व्यक्त केले.
नागपूर येथील रहिवाश्यांकरिता चांगली सेवा आज फिडरच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. एमआयडीसी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकरीता ही सुविधा फार महत्वाची ठरणार आहे. यामुळे वेळ व पैसेची दोन्हीची बचत होईल व प्रदूषण मुक्त शहर राहण्यास मदत होईल. आम्ही आजचा ग्रीन डे म्हणून साजरा करित असून घर ते ऑफिस व ऑफिस ते घर हा प्रवास मेट्रो व महानगर पालिकेच्या फिडर बसनेच करणार आहोत. 10000 नागरीक दररोज शहरांतून ये – जा करतात या सुविधेमुळे बुटीबोरी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना याचा लाभ नक्कीच होणार आहे असे प्रतिपादन एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. किशोर मालविया आणि पुनित महाजन यांनी केले.
महा मेट्रोने नुकतेच खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्या करिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु केली आहे. यामुळे प्रवाश्यांना प्रवास करणे सोईस्कर झाले आहे व नागरिक याचा वापर देखील करीत आहेत. बुटीबोरी एमआयडीसी या ठिकाणी शहरांतून दररोज हजारो प्रवासी स्वतःच्या व अन्य वाहनाने ये जा करतात. महा मेट्रोने या सर्व बाबींची नोंद घेत सहज उपलब्ध होऊ शकेल अश्या प्रकारे मेट्रो आणि फिडर सर्विसचे नियोजन केले आहे. त्याच बरोबर आता धावत्या मेट्रो मध्ये सायकल सोबत नेणे देखील शक्य असल्याने मेट्रोचा वापर उपयुक्त ठरला आहे.
‘ग्रीन डे’ चा मुख्य उद्देश एमआयडीसी येथील कंपनी व आसपासच्या परिसरात कार्यरत कामगार व कर्मचारी मेट्रोचा उपयोग करून प्रत्येक महिन्याचा एक दिवस हा ग्रीन डे म्हणून साजरा करण्यासंबंधी निर्णय नोव्हेंबर महिन्यात आयोजित मेट्रो संवाद येथे घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने कर्मचाऱयांनी स्वतःचे वाहन न वापरता मेट्रो व फिडर सर्विसचा उपयोग ऑफिस जाण्याकरिता व तसेच ऑफिस येथून घरी परत येण्याकरिता पर्यावरणपूरक वाहतुकीचा उपयोग केला. यावेळी कमर्चारी शहरातून बुटीबोरी येथे येतांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करण्यासंबंधी घोषणा केली व जास्तीत जास्त कर्मचारी मेट्रोचा उपयोग करतील असे आवाहन यावेळी करण्यात आले. या मागचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक सुरक्षित, आरामदायक, कार्यक्षम तसेच आर्थिक आणि विश्वासार्ह सेवा नागरिकांना उपलब्ध व्हावे तसेच कुठल्याही त्रासा विना मेट्रोचा उपयोग करावा.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).