Home हिंदी Merry Christmas | … अन मेट्रो मध्ये प्रकट झालेत सांता क्लॉज

Merry Christmas | … अन मेट्रो मध्ये प्रकट झालेत सांता क्लॉज

650
  • सांता क्लॉज ने मेट्रो प्रवाश्याना केले चॉकलेट छे वाटप
  • पर्यावरणपूरक वाहन वापरण्याचा दिला संदेश

नागपूर ब्यूरो : “ख्रिसमस” निमीत्य महा मेट्रोच्या वतीने सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे विशेष प्रकारची सजावट करून मेट्रो प्रवाश्याना “ख्रिसमस” च्या शुभेच्छा देण्यात आल्या। मेट्रो मग़फ़िए अचानक सांता क्लॉज दिसल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला. सांता ने मेट्रो मध्ये लहान मुलांना व मेट्रो प्रवाश्याना चॉकलेट व उपहार भेट दिले.

यावेळी संता ने नागपूर मेट्रोने दैनंदिन प्रवास व पर्यावरणपूरक वाहनांचा जास्तीत जास्ती उपयोग करावा हा संदेश देत “ख्रिसमस” च्या शुभेच्छा दिल्या. सकाळ पासूनच मेट्रो स्टेशन येथे या सांता क्लॉज ने मेट्रो प्रवाश्यांचे स्वागत केले व मेट्रो ट्रेन मध्ये देखील नागरिकांशी संवाद साधला.

प्रवाश्यानी देखील या विशेष दिना निमित्य सांता क्लॉज व मेट्रो स्टेशन येथे तयार करण्यात आलेल्या “ख्रिसमस ट्री” सोबत सेल्फी घेतल्या. तसेच दैनंदिन मेट्रोचा उपयोग करणाऱ्या प्रवाश्यानी आपले मेट्रो प्रवासा दरम्यान अनुभव सांगितले. हिंगणा मार्गावरील मयुरेश यांनी सांगितले कि, ऍक्वा लाईन मार्गिकेवरील नवीन सुरु झालेल्या मेट्रो स्टेशनमुळे मला माझ्या घरापासून ते ऑफिस पर्यंत प्रवास करणे सोपे झाले आहे.मेट्रोच्या रूपात चागली सुविधा आज कार्यवत आहे व याचा आमच्या सारख्या प्रवाश्याना अभिमान आहे. कमी खर्चात माझा प्रवास होत असून नागरिकांनी देखील मेट्रोचा उपयोग करावा असा संदेश मेट्रो प्रवाश्यानी दिला.वाढती लोकसंख्या,वाढते शहरीकरण बघता सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत महत्वाची असून मेट्रोचा उपयोग नागरिकांना करावा असे आवाहन निवृत्त पोलीस अधिकारी देशपांडे यांनी नागरिकांना केले.

ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. महा मेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशी ई – स्कुटर प्रणाली सेवा प्रवाश्यान करता मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध करून दिली असून या ई- स्कुटर प्रणाली मध्ये वाढ देखील होत आहे. या व्यतिरिक्त खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. मल्टी मॉडेल इंटीग्रेशन अंतर्गत फस्ट टू लास्ट माईल कनेटीव्हीटी नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होत आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).