Home हिंदी फळभाज्यांद्वारे ठसेकाम करुन दिव्यांग मुलांनी साकारली एव्हरग्रीन पवारांची कलाकृती

फळभाज्यांद्वारे ठसेकाम करुन दिव्यांग मुलांनी साकारली एव्हरग्रीन पवारांची कलाकृती

762

मुंबई ब्यूरो : मुंबईतील कुलाबा परिसरात दिव्यांग मुलांनी फळभाज्यांद्वारे ठसेकाम करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 10 x 50 फुट (500 चौरस फूट) कलाकृती साकारली आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टातून पिकवलेल्या फळ भाज्यांद्वारे ठसेकाम करुन ही कलाकृती बनवली आहे. शरद पवार यांचं चित्र साकारण्याठी हिरवा, पिवळा आणि पोपटी अशा रंगांचा वापर केला आहे. शबनम अन्सारी, आकांक्षा वाकडे, अभिषेक मोवाडे, मनश्री सोमण, सीया पारकर, अपूर्वा राणे या दिव्यांग मुलांनी ही कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती सेंट अॅन गर्ल स्कूल इथे बनवण्यात आली. त्यासाठी सहा तास लागले. मुलांनी दुपारी तीन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत हे चित्र साकारलं.

या कलाकृतीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. सुमीत पाटील, मनोज आमरे आणि दीपक पवार यांची ही संकल्पना असून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या शरद पवार यांचा आदर व्यक्त करणारी ही कलाकृती असल्याचं त्यांनी “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला सांगितलं.

शरद पवार यांचं कलेवर जिवापाड प्रेम आहे आणि ते नेहमीच कलाकारांच्या मागे आधारस्तंभ म्हणून उभा राहतात. तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम तत्पर असतात, त्यामुळेच एव्हरग्रीन शरद पवारांची कलाकृती साकारल्याचं सुमीत पाटील, मनोज आमरे आणि दीपक पवार यांनी म्हटलं.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).