बॉलीवुड ची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी अत्यंत उत्सुक आहेत. अनुष्का सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिच्या गरोदरपणाचा प्रवास सर्वांच्या भेटीला आणत आहे. आता प्रेग्नंट अनुष्काने नुकतेच वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे.
अनुष्का शर्मा ने तिचे हे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. अनुष्काने ‘वोग’ या प्रसिद्ध मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावर तिला खूप लाइक्स मिळत आहेत.
अनुष्का शर्मा ने अनुष्काने ‘वोग’ या प्रसिद्ध मासिकाच्या जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट केले आहे. अनुष्काचे हे बेबी बंपसोबतचे फोटो सर्वत्र खूपच व्हायरल होत आहेत.
अनुष्काचे हे सुंदर फोटो पाहिल्यानंतर कमेंट करण्याचा मोह दस्तर्खुद विराटलादेखील आवरता आला नाही. विशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे. विराटने “सुंदर” लिहून फोटो वर कमेंट केली आहे. अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावं यासाठी पॅटर्निटी लीव्ही घेऊन विराट भारतात परतला आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).