Home मराठी Nagpur | नासुप्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Nagpur | नासुप्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

756

नागपूर ब्यूरो : चूल आणि मूल सारख्या रूढीवादी परंपरेतून स्त्रियांना मुक्त करणारी भारताची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका स्त्री, अनाथांची माता आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 190वी जयंती सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.

कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) प्रशांत भांडारकर यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.