Home मराठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महीला शिक्षण दिनाचे आयोजन

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महीला शिक्षण दिनाचे आयोजन

643

“फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठी आपले शासन आणावे लागेल ” डाॅ. बबनराव तायवाडे

नागपूर ब्यूरो : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे, सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महीला शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे तसेच प्रमुख वक्त्या प्रा कीर्ती काळमेघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, प्राचार्या डॉ शरयु तायवाडे, शहराध्यक्षा वृंदा ठाकरे, कांग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, उपस्थित होते.

या प्रसंगी मा. कीर्ती काळमेघ यांनी सावित्रीमाई यांच्या जिवनावर वर प्रकाश टाकतांना सांगितले की त्यांनी चालविलेला शिक्षणाचा वसा बहुजन समाजाच्या घरोघरी विचारांच्या रुपाने,मनामनात कोरला गेला पाहिजे. आपल्या अध्यक्षीय मनोगतात, डॉ तायवाडे म्हणाले की काही का असेना शासणाणे सावित्रीमाई ची जयंती “महीला शिक्षण दिन” म्हणून घोषित केल्याबद्दल आपण सर्व ओबीसी बांधवांनी शासनाचे धन्यवाद मानायला पाहिजे,ही नांदी आहे, आपल्याला फुले दाम्पत्याला भारतरत्न देणारे शासन आणायचे आहे. या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली.

कार्यक्रमाला ओबीसी महासंघाचे समन्वयक शरद वानखेडे, विर्दभाचे कार्याध्यक्ष शकील पटेल, उत्तर नागपूर चे अध्यक्ष अविनाश पोळे, पुर्व नागपूर चे अध्यक्ष तथा पुर्व नगरसेवक नाना झोडे , परमेश्र्वर राउत, गुणेश्वर आरीकर, विनोद उलिपवार, भास्कर भोंडे ,छाया वानखेडे, गणेश माखले, प्रणिता वानखेडे, अर्चना बर्डे, विणा कुकंडे, विना बेलगे, लीना कटारे, लक्षमी सावरकर, रुतुजा वैद्य, सुनीता येरणे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन कुंभलकर , निलेश कोढे, राजू मोहोड, सोनिया वैद्य, ऋषभ राऊत, आणि ओबीसी समाजाच्या तसेच ओबीसी महासंघाच्या महीला, पुरुष, विद्यार्थी युवक, युवती,शिक्षक कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन तथा आभार मा. अरुणा भोंडे, यांनी अवधेशानंद पब्लिक शाळेच्या प्राचार्या उमेकर, आणि सर्व कर्मचाऱ्यांनचे आभार व्यक्त केले. नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मान्यवरांच्या नियुक्ती करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.