नागपूर ब्यूरो : महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन,क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.सुनिल केदार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या धर्मसुधारक विचारांची आजच्या समाजाला गरज आहे असे प्रतिपादन केले. जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटीतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्य आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव नानाभाऊ गावंडे ,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मिताई बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. तक्षशिलाताई वाघधरे होत्या. महिला उद्योजिका सौ.मीनाताई भागवतकर, शिक्षण व अर्थ समिती जि.प.नागपूरच्या सभापती सौ.भारतीताई पाटील, समाज कल्याण सभापती सौ.नेमावलीताई माटे, अनु.जाती विभागाचे अध्यक्ष राहुलभाऊ घरडे, जि.प.सदस्य सौ.अवंतिकाताई लेकुरवाळे, सौ.ज्योतीताई सिरसकर, सौ.उईकेताई, प्रदेश सचिव वैशालीताई मानवटकर, ब्लाॕक अध्यक्षा सौ.योगिताताई इटनकर, सौ.शालीनीताई मनोहर, सौ.सविताताई भड, सौ.वंदनाताई कुंभारे, सौ.अश्विनीताई नागमोते, सुरैय्या बानो व माधुरीताई देशमुख उपस्थित होते.
यावेळी सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याबाबत तसेच महिलाकरीता घरेलू कामगार मंडळाची नव्याने पुर्नरचना करण्याची महिला काँग्रेस कमिटीतर्फे मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन सौ.मनिषाताई लोहकरे यांनी केले आणि आभार सौ.संगिताताई चव्हाण यांनी मानले. सौ.श्यामलाताई वाघधरे (सोशल मिडीया), सौ.लताताई लुंढेरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.