Home Election नागपूर जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायत पैकी 73 ग्रामपंचायतीवर भाजप ला स्पष्ट बहुमत

नागपूर जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायत पैकी 73 ग्रामपंचायतीवर भाजप ला स्पष्ट बहुमत

763

नागपुर ब्यूरो : नागपूर जिल्ह्यात नुकत्याच 129 ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या,यात भारतीय जनता पक्षाने ७३ ग्रामपंचायतीवर स्पष्ट बहुमत मिळाले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविली असता नागरिकांनी त्यांना नाकारले,भारतीय जनता पक्षाने विकासाच्या कामावर निवडणूक लढविली त्यात भरघोष यश मिळाले. कोराडी ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

नागपूर जिल्ह्यात भाजपची मुसंडी
  • काटोल 22 – 09
  • कामठी 20- 14
  • रामटेक 19- 06
  • सावनेर -17-0
  • हिंगना 10- 06
  • उमरेड   42-30
    एकूण 130 – 65

माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे,भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंदजी गजभिये यांच्या नेतृत्वावर नागरिकांनी विश्वास दाखविला,भारतीय जनता पक्षाने विजयाचे सर्व श्रेय कार्यकर्त्यांना व पक्षातील नेत्यांना दिले आहे.

गोंदिया जिल्हा : गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीला खिंडार पडले आहे. भाजपाचे इथे एकहाती वर्चस्व सिद्ध झाले आहे. या जिल्ह्यात एकूण १८१ ग्रामपंचायतीपैकी भाजपला ९५ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले आहे. इथे महाविकास आघाडीला ७८ जागा आणि ८ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले आहे.

गोंदिया जिल्हा
  • आमगांव- 22
  • देवरी- 29
  • सालेकसा- 09
  • गोरेगाव- 25
  • तिरोड़ा- 19
  • गोंदिया- 29
  • मोरगांव अर्जुनी- 29
  • सडक अर्जुनी- 19
  • एकूण 181 – 95

भंडारा जिल्हा : भंडारा जिल्ह्यात भाजप ला एकहाती सत्ता मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील १४८ पैकी ९५ ग्राम पंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. या जिल्ह्यात महविकास आघाडीला केवळ ५३ जागा मिळाल्या आहेत.