वर्धा ब्यूरो : ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले. यात भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. ५० पैकी २९ ग्राम पंचायती मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. !काँग्रेसच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतीवर यावेळी मतदारांनी भाजपला कैाल दिला आहे.
सेलू तालुक्यातील सर्वात मोठ्या हिंगणी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजपचे आठ तर राष्ट्रवादी कॅांग्रेस प्रणीत निघडे गटाचे सात उमेदवार विजयी झालेत. येळाकेळी ग्रामपंचायतीवर भाजपाचे १२ उमेदवार निवडूण आले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायतमध्ये भाजपने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. तर तीन जागांवर कॅांग्रेसविजयी झाली. आष्टी तालुक्यात पोरगव्हाण ग्रामपंचायतीत ६ जागांवर भाजप तर कॅांग्रेस तीन जागांवर विजयी झाली आहे.