Home हिंदी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकर्‍यांचा सत्कार

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकर्‍यांचा सत्कार

629

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री पाेलीस पदक प्राप्त पाेलीस अधिकर्‍यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नागपूर शहर पाेलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पाेलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे व सहायक पाेलीस उपनिरीक्षक संदीप शर्मा यांना नुकताच केंद्रीय गृहमंत्री पाेलीस पदक जाहीर झाले आहेत. या दाेन्ही पाेलीस अधिकर्‍यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन गृहमंत्री देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी या दाेन्ही पाेलीस अधिकर्‍यांनी बजावलेल्या कामाची प्रशंसा केली तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.