सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रम नागरिकांच्या फायद्याचा : शिक्षिकानी केले मनोगत व्यक्त
नागपूर ब्युरो : महा मेट्रोतर्फे नागरिकांन करता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अनोखी योजना आखण्यात आली असून नागरिकांचा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या योजने अंतर्गत हैप्पी टीचर्स क्लब, जिल्हा परिषद शिक्षिका वर्गानी मकर संक्रातिच्या निमित्याने ऍक्वा लाईन मार्गिकेवरील(सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर स्टेशन) व ऑरेंज लाईन मार्गिकेवरील (सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) दरम्यान हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला महत्वपूर्ण म्हणजे या सर्व शिक्षिकानी पारंपरिक वेशभूषा परिधान करत डोक्यावर सर्व महिलांनी फेटा बांधला होता.
सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा : सेलिब्रेशन ऑन व्हील्स हा खूप चांगला उपक्रम मेट्रोने आमच्या करता उपलब्ध करून देण्यात करता प्रशासनाचे आभारी आहोत. मेट्रोच्या निर्माण कार्यापासून ते आज प्रत्यक्ष मेट्रोचा प्रवास अनुभवित आहोत जो कि,अविस्मरणीय आहे.आम्हाला अभिमान आहे कि आमच्या शहरामध्ये मेट्रो आहे. मेट्रोने कमी वेळात अंतर गाठता येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच विद्यार्थ्याने मेट्रोने प्रवास करावा.
जिल्हा परिषद शाळा, बेसा सहायक शिक्षिका : आज अखिल जिल्हा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सेलिब्रेशन ऑन व्हील्स अंतर्गत हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला असून आज 110 महिला मेट्रोने प्रवास करीत आहे. मेट्रो स्टेशन व ट्रेनच्या आत स्वच्छता असून मेट्रो कर्मचारी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. नागपूर मेट्रो ही शहराची शान असून हा अभिमान असाच राहायला पाहिजे. नागपूर मेट्रो सर्व जनतेला परवडणारी आहे. आजचा महिलांचा कार्यक्रम अतिशय आनंदाने आम्ही साजरा केला या करता मेट्रो प्रशासनाचे आभार व्यक्त करत असल्याचे मत व्यक्त केले.
महा मेट्रोतर्फे नागरिकांन करता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अनोखी योजना आखण्यात आली आहे. फक्त 3050 रुपये मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट,लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरा करू शकतात. `सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या अनोख्या योजनेंतर्गत नागपूरकर कार्यक्रम आता मेट्रो गाडीत साजरा करू शकतात. महा मेट्रोच्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असून नागरिक या करता बुकिंग देखील करीत आहे. ही योजना सर्वांकरिता खुली असून नागरिक तसेच इव्हेंट ऑर्गनायझर देखील याचा लाभ घेऊ शकतात. 3 कोचच्या मेट्रो मध्ये कोरोना पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त फक्त 150 व्यक्ती आमंत्रित करता येईल व 1 तासा करिता फक्त रु. 3 हजार मोजावे लागतील तसेच अतिरिक्त वेळ करिता रु.2 हजार प्रति तास द्यावे लागतील ज्यामध्ये मेट्रो कोचला आकर्षक पद्धतीने सजविण्यात येईल.