28 जानेवारी पर्यंत ताडोब्यात राहणार
चंद्रपूर ब्युरो : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आपल्या परिवारासह ताडोबात 25 जानेवारीला दाखल झाले असून आज पासून पुढील 4 दिवस तो ताडोबात मुक्कामी राहणार आहे.
सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासहित बफर झोन मध्ये सफारी करणार असल्याची देखील माहिती मिळाली असून 28 जानेवारी पर्यंत ते ताडोब्यात असणार आहे. त्यांच्यासह मुलगा अर्जुन, मुलगी सारा व पत्नी डॉ. अंजली सुद्धा जंगल सफारी करणार आहे. यापूर्वी देखील सचिन आपल्या कुटुंबासोबत ताडोबा ला आला होता.