Home Maharashtra Nagpur । अंबाझरी तलावात साजरा केला प्रजासत्ताक दिन

Nagpur । अंबाझरी तलावात साजरा केला प्रजासत्ताक दिन

776

नागपूर ब्युरो : जल संरक्षण व सवर्धन या संस्थेने नागपूर शहरातील अंबाझरी तलावात मंगळवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला. वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची खूपच चारचा होत आहे.

दर वर्षी प्रमाणे यंदाचा 72 प्रजासत्ताक दिन जल संरक्षण व सवर्धन या संस्थेने अंबाझरी येथे अनोख्या प्रकारे साजरा केला. तलावाच्या मधोमध जाऊन झेंडा वंदन सकाळी 8:30 वाजता झेंडा वंदन करण्यात आले. मुख्य म्हणजे सायंकाळी याच पद्धतीने झंडा उतरविण्यात येणार आहे. अंबाझरी जल संरक्षण व सवर्धन नागपूर या संस्थेचे हे अनोखे झंडावंदन सर्वांसाठी कोतुहलाचा विषय झालेला आहे.