Home National कृषिपुत्रांच्या बाजूने ठामपणे उभे रहा : दिलीप पनकुले

कृषिपुत्रांच्या बाजूने ठामपणे उभे रहा : दिलीप पनकुले

851

नागपूर ब्युरो : “भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच आज मोडकळीस आलेला आहे. भारत नावाच्या या कृषिप्रधान देशात कृषकांना कृषिविषयक जाचक कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत असेल आणि त्यांच्या न्याय्य आंदोलनाला बेदखल मानले जात असेल तर ही बाब सबंध भारतवर्षाला अंतर्मुख करणारी आहे. म्हणून स्वतःला भारतीय मानणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे” असे सडेतोड प्रतिपादन संस्थाध्यक्ष दिलीप पनकुले यांनी केले. ते माँ वैष्णवी शिक्षण संस्था द्वारा संचालित शांती विद्या भवन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, डिगडोह येथे झालेल्या आजच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने बोलत होते.

संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. सुषमाताई पनकुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्थेचे सचिव संग्राम पनकुले हे कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. लुसेंटचे श्री. राऊत साहेब, सोपानराव शिरसाट, संजय शेवाळे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.

कार्यक्रमाला माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी विभागाचे प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, माध्यमिक हिंदी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ममता ढोरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता फ्रान्सिस, पर्यवेक्षिका श्रीमती प्रगती कथलकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कविता महाजन यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. वृंदा पाटील यांनी मानले.