Home National Nagpur | ओबीसी महिला महासंघ तर्फे नरेंद्र नगर येथे गणराज्य दिन साजरा

Nagpur | ओबीसी महिला महासंघ तर्फे नरेंद्र नगर येथे गणराज्य दिन साजरा

678

नागपूर ब्युरो : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नागपूर शहर तर्फे 26 जानेवारी 2021 रोजी नाहाते प्रीस्कुल, नरेंद्र नगर, नागपूर येथे गणराज्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून नागपूर शहर कार्यकारिणीच्या पदभार नियुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच महिलांना ओबीसी हक्क, अधिकार, मागण्या याबद्दल माहिती कळावी, त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता यावी यासाठी ओबीसींच्या विचारांचे वाण म्हणून पुस्तके देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृंदाताई ठाकरे यांनी केले.मार्गदर्शन डॉ. बबनराव तायवाडे, अध्यक्ष रा.ओ.बी.सी महासंघ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.शरयू तायवाडे यांनी भूषविले. कल्पना मानकर महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांनी मार्गदर्शन केले. संचालन कालिंदी नाहाते तसेच आभार प्रदर्शन नंदा देशमुख यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन वृंदा ठाकरे, अनिता ठेंगरे, नंदा देशमुख,कालिंदी नाहाते यांनी केले.त्या वेळी ओबीसी युवक वर्ग देखील उपस्थित होता.पद नियुक्ती करतेवेळी उपस्थितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. निर्मला मानमोडे,अर्चना डेबरे ,मिनाक्षी गतफणे, विणा कुकडे ,रंजना वाळके, कुंदा वरठी, लीना कटारे, विणा बेलगे, ऋतिका डाफ ,अर्चना बरडे ,हर्षा चौधरी ,कल्याणी ठाकरे, स्नेहा वानखेडे, संजना देशमुख ,अरुणा भोंडे, सविता तायवाडे ,विद्या सेलोकर, गौरी सावरकर, सुषमा रडके ,मंगला देशमुख,बागडे,दर्शना काळे, कल्पना आमधरे, सुनिता येरणे, रंजना कडुकर,सौंदर्या धवड,मंदा बोबडे,वंदना वानकर,तसेच उदय देशमुख, अजिंक्य देशमुख, निलेश कोढे,रोशन कुंभलकर, ऋषभ राऊत, सुधाकर तायवाडे,मोहोड ,नाहाते सर इ.उपस्थित होते.