नागपूर ब्युरो : प्रजासत्ताकदिनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचा पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. अंबाझरी पोलीस ठाण्याचे शारदाप्रसाद रमाकांत मिश्रा यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
काटोल येथील वीरमाता श्रीमती मीरा रमेशराव सतई आणि हिंगणा येथील विरपत्नी श्रीमती प्रमिला नरेश बडोले यांना ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी (अतिरिक्त) डॉ. असिम इनामदार, हिंगणाचे तालुका आरोग्य अधिकारी प्रविण पडवे यांच्यासह भारत स्काऊट गाईडमधील मंजुषा रुपसिंग जाधव, सागर नंदकिशोर श्रीवास यांना सन्मानित करण्यात आले.
शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुनिल महाकाळकर, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे डॉ. धिरज सगरुळे, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सरचे डॉ.डी. पी.सेनगुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपविभागीय अधिकारी, नागपूर शहर शेखर घाडगे व श्रीमती इंदिरा चौधरी, तहसिलदार, नागपूर शहर श्री. सुर्यकांत पाटील यांना पुरस्कृत करणत आले. डागा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सिमा पारवेकर सवई, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलभा मूल, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधुरी थोरात, महानगरपालिकाचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी भैसारे, साथरोग विभागाचे श्री. वासुदेव आकरे यांना सन्मानित करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेते रोशन सुरेश भोयर, अक्षय सितकुरा मरस्कोल्हे आणि विशाखा परीहर समरीत यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत बबन कान्हुजी काटोले, आनंद प्रबोध सदावर्ते, महेश गणपतराव चौधरी, विमल वामन बानाईत, नरेंद्र सितारम बांगडे, सुमन शामराव कठाने, मिना श्रीराम कठाने, नामदेवराव पुनारामजी भारस्कर, भैय्यालाल बारकुजी नाईक, मंगला अरविंद इटनकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मागणीपत्र वितरीत करण्यात आले.
स्वर्णिम विजय वर्षानिमित्त विजय ज्योतीचे उद्घाटन करणाऱ्या दोन अधिकारी व 15 सैनिकांचा गौरव करण्यात आला.
ए पी जे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन रामेश्वरम आणि स्पेस झोन इंडियातर्फे आयोजित पेलोड क्यूब चॅलेंज उपक्रमात विदर्भातून 160 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी नागपूर सुरेंद्रगढ महापालिका हिंदी शाळेच्या स्वाति विनोद मिश्रा आणि काजल रामनरेश शर्मा विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विज्ञान शिक्षिका दीप्ती बिष्ट ह्यांना देखील सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचलन डॉ. दिपक साळीवकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिकांसह माजी आमदार यादवराव देवगडे, एच.क्यु झमा, माजी खासदार गेव्ह आवारी यासह विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते.