Home Maharashtra अपघातास जबाबदार असलेल्यांवर पालकमंत्री सुनील केदार यांचे कारवाईचे निर्देश

अपघातास जबाबदार असलेल्यांवर पालकमंत्री सुनील केदार यांचे कारवाईचे निर्देश

733

वर्धा ब्यूरो : उत्तम गाल्वा मेटॅलिक्स या कंपनीमध्ये फरनेस मधील गरम हवा व राख अंगावर आल्यामुळे 38 कामगार जखमी झालेले आहेत.सदर अपघात गंभीर स्वरुपाचा असून या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील यांनी दिलेत.

तसेच सदर अपघाताची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचेमार्फत कारखाने अधिनियम १९४८च्या तरतूदीनुसार तसेच सरकारी कामगार अधिकारी यांचे मार्फत वेतन प्रदान नियम व कामगार विमा नियमाच्या
अनुषंगाने तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत तपासणी करुन अपघातास जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.