Home मराठी Nagpur । इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे जिल्हाभरात तीव्र आंदोलन

Nagpur । इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे जिल्हाभरात तीव्र आंदोलन

691

हिंगणा, वाडी येथील आंदोलनात खासदार कृपाल तुमाने यांचा सहभाग

नागपूर ब्युरो : केंद्र सरकारने इंधनाच्या दरात केलेली अन्यायकारक वाढ मागे घ्यावी यासाठी खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात रामटेक लोकसभा मतदार संघातील सर्व प्रमुख शहरे व तालुका मुख्यालयी आंदोलन करण्यात आले. शिवसेना, युवसेना यासह पक्षातील सर्वच शाखेने निषेध आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाला तीव्र स्वरूप आले होते.

खासदार कृपाल तुमाने यांनी वाडी व हिंगणा येथे शिवसेना, युवसेना यांच्या निषेध कार्यक्रमात सहभागी झाले. वाडी येथे आंदोलकांनी केंद्र सरकारच्या पुतळ्याचा निषेध करीत रास्ता रोको केला. हिंगणा येथे तहसील कार्यालयावर भजन रॅली काढून निषेध नोंदविला. यानंतर हिंगणा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. खासदार श्री कृपाल तुमाने म्हणाले, जागतिक बाजरपेठेत क्रूड ओईलचे दर ५९ डॉलर प्रती बॅरेल आहेत.

मात्र केंद्र सरकारने लावलेला अतिरिक्त अधिभार व मूल्य वर्धित किंम्मत यामुळे पेट्रोल, डीजेल व इतर इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोल, डीजेलसह सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयाने वाढ केली आहे. वारंवार केली जाणारी ही वाढ अन्याय कारक असून यामुळे सर्व सामान्य जनतेच्या खिशावर भार वाढला आहे. यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी शिवसेना जिल्हाभर आंदोलन करीत आहेत.

रामटेक लोकसभा मतदार संघातील सर्व तालुका मुख्यालयात तहसील कार्यालयावर पेट्रोल डीजेल व इंधन दरवाढीचा निषेध नोंदवीत केंद्र सरकारच्या नावाने निवेदन तहसीलदार यांना सोपविण्यात आले. तर रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख शहरात मुख्य मार्गावर जोरदार निषेध करण्यात आला. जिल्हा प्रमुख राजू हरणे, संदीप इतकेलवर, युवा सेना जिल्हा अधिकारी हर्शल काकडे, शुभम नवले, सर्व उपजिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.