Home Maharashtra नामप्रविप्राचे नवे आयुक्त म्हणून मनोज सूर्यवंशी यांनी स्वीकारला पदभार

नामप्रविप्राचे नवे आयुक्त म्हणून मनोज सूर्यवंशी यांनी स्वीकारला पदभार

593

नासूप्रचे सभापती म्हणूनही असेल अतिरिक्त जबाबदारी

नागपूर ब्युरो : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हुणुन मनोज सूर्यवंशी यांनी सोमवार, 8 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला, मनोज सूर्यवंशी यांच्याकडे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणूनही अतिरिक्त जबाबदारी असेल. मनोज सूर्यवंशी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2010 बॅचचे अधिकारी आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अप्पर सहसचिव पदावरून त्यांची याठिकाणी बदली झाली आहे. आईएएस अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याहस्ते मनोज सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले. सिव्हिल इंजिनीअर असलेले मनोज सूर्यवंशी यांनी नागपूर विभागात यापूर्वी महसूल उपायुक्त, अप्पर आयुक्त तसेच भंडारा, वर्धा जिल्ह्यातही त्यांनी विविध प्रशासकीय पदावर सेवा दिली आहे.

यावेळी कार्यक्रमात नामप्रविप्राचे अपर आयुक्त हेमंत पवार, नासुप्रचे महाव्यवस्थापक व नामप्रविप्रा मध्ये नगर रचना विभागाचे उप-संचालक लांडे, नामप्रविप्राच्या अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी संजय पोहेकर, नामप्रविप्रा व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.