Home मराठी Chandrapur । इको-प्रो ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत गोंडराजे बिरशहाच्या समाधीवर पुष्पअर्पण

Chandrapur । इको-प्रो ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत गोंडराजे बिरशहाच्या समाधीवर पुष्पअर्पण

780

युवकांनी आदर्श घेण्याची गरज – शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या वास्तुवर पुष्पअर्पण

चंद्रपूर ब्युरो: शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्थेचे सदस्य यांनी पुष्पअर्पण करून कार्यक्रम साजरा केला.

आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोविडमुळे विदयार्थ्यांना सहभागी करून घेता आले नाही.

गोंडराजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवनातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता राजेच्या मृत्युनंतर राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातुन आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माण सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून राणीने एक आदर्श घालुन दिलेला आहे. राणी हिराई आणि गोंडराजे बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज आहे, ऐतिहासिक वास्तू संवर्धन करिता पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.

आज संपन्न झालेल्या सलाम राणी हीराई कार्यक्रम करिता इको-प्रो चे नितीन रामटेके, संजय सब्बनवार, सुनील पाटील, सुधीर देव, जयेश बैनलवार, मनीष गावंडे, कपील चौधरी, अमोल उटटलवार, पूजा गहुकर, दुर्गेश्वरी वायकर, सारिका वाकुडकर पुरातत्व विभाग चे कर्मचारी उपस्थित होते.