ग्रीड वर चीनच्या हल्ल्याचे प्रकरण, माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची मागणी
नागपूर ब्युरो : अधिकाºयांच्या चुकीमुळे मुंबई 3 दिवस अंधारात होती. राज्याचे गृहमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी चीनने सायबर हल्ला केल्याने आमचे ग्रीड फेल झाल्याचा कपोलकल्पित अहवाल तयार करीत जनतेची दिशाभूल केली, असा स्पष्ट आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र परिषदेत केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री व गृहमंत्री या दोघांवर कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
केंद्राच्या उर्जा खात्यानी कोणताही सायबर हल्ला नाही ही मानवी आणि मेकॅनिकल त्रुटी आहेत असं घोषित केला आहे. ऊर्जामंत्री आणि गृहमंत्री यांनी आधी तांत्रिक बाबी तपासून घेतला पाहिजे आणि सायबर हल्ला झाला आहे, असा चुकिचा अहवाल विधान मंडळ मध्ये मांडू नये.@AnilDeshmukhNCP @NitinRaut_INC pic.twitter.com/XstBeB3b7m
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 3, 2021
ते म्हणाले, न्यूयार्क टाईम्सच्या बातमीवर राज्याच्या आयपीएस अधिकाºयाने अहवाल तयार केला. त्यात त्याने याचा संबंध चीनशी जोडला. निदान त्या आयपीएस अधिकाºयाने केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करून खातरजमा करायला हवी होती. केवळ न्यूयार्क टाइम्सने छापले म्हणून असा अहवाल तयार करणे चुकीचे आहे. अधिवेशनाच्या तोंडावर आपले अपयश लपवण्यासाठी ऊर्जामंत्री व गृहमंत्री सपशेल खोटे बोलत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. राज्याचे ऊर्जामंत्री व गृहमंत्री यांनी चीनी सायबर हल्ल्यामुळे 12 आॅक्टोबर 2020 रोजी मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याचे सोमवारी घेतलेल्या पत्रिपरिषदेत सांगितले होते. त्यावर ते बोलत होते.