Home मराठी Dr. Parinay Fuke । मासेमारी करणाऱ्यांना तलावाचा ठेका मोफत देण्याची मागणी

Dr. Parinay Fuke । मासेमारी करणाऱ्यांना तलावाचा ठेका मोफत देण्याची मागणी

मुंबई ब्यूरो : विदर्भात गेल्या 2 वर्षापासून अवकाळी पाऊस आणि कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मासेमारीकरिता प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे 2021-2022 आणि 2022-2023 या पुढील 2 वर्षासाठी संपूर्ण तलावाचा ठेका पूर्णत: मोफत दिला जावा, अशी मागणी गोंदिया – भंडारा जिल्ह्याचे आ. डॉ. परिणय फुके यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.

ते म्हणाले, तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोडया पाण्यात मासेमारी करणारे कोळी बांधव आहेत. राज्य शासनाने या कोळी बांधवांसाठी कल्याणकारी विकास मंडळाची स्थापना करावी आणि निधी उपलब्ध करुन द्यावा.