अमरावती ब्युरो : अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी महिला दिनाच्या निमित्ताने संदेश देताना म्हटले आहे की अत्याचार होत असेल तर शांत बसू नका. अत्याचाराचा विरोध करा. जर तुम्ही अत्याचार सहन कराल तर ते कधीच थांबणार नाही. उलट त्यात सातत्याने वाढ होत जाईल. म्हणून अत्याचाराच्या विरोधात बोलायला शिका. प्रसंगी पोलिसांची मदत घ्या.
डॉ. आरती सिंह याप्रसंगी म्हणाल्या की केवळ एक दिवस महिला दिवस साजरा करण्यापेक्षा सर्वांनी मिळून 365 दिवस महिला सुरक्षित पणे समाजात वावरू शकतील असे वातावरण निर्माण केले गेले पाहिजे. डॉ. आरती सिंह म्हणाल्या की महिलांनी सुद्धा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात नेहमी खुलून बोलले पाहिजे.
त्या म्हणाल्या, महिला असो वा पुरुष सर्वांनी महिलांच्या हक्कांची जाणीव वर्षभर ठेवायला पाहिजे. कारण महिलांना केवळ एक दिवस सन्मानाची वागणूक दिल्याने समाजात फार काही वेगळे बदल होणार नाही. सर्वांनी मिळून नेहमीच महिलांवर होणारे अत्याचार दूर करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.
महिलांना विशेष सूचना
डॉ. आरती सिंह म्हणाल्या की महिला दिनाच्या निमित्ताने मी विशेषत्वाने महिलांना ही सूचना करेल की त्यांनी आयुष्यात स्वप्न बघावीत आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. आधीच अन्याय, अत्याचार सहन करू नये. उलट त्याविरोधात खुलून बोलावे.