नागपूर ब्यूरो : 14 एप्रिल 2021 ला भारतरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोवीड-19 च्या काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असता सामाजिक भान राखून गट ग्रामपंचायत पिपळा/घोगली, साईनाथ ब्लड बॅंक, नागपूर आणि गावातील सामाजिक संस्थेच्या तरूणानी एकत्र येऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. किमान 35 लोकांनी या मध्ये रक्तदान करून त्यांचे सहकार्य नोंदवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गट ग्रामपंचायत पिपळा/घोगली चे सरपंच नरेश भोयर, उपसरपंच प्रभू भेंडे, सदस्य प्रकाश भोयर, सुनील राहाटे, वनीताताई कावळे, शकुनताई वाघ, मनोहर सपकाळ, श्रीधर गाडगे, करण खंडाळे, ईशान आकांत, प्रीयम ओझा, अंकुश धाडसे, दिलीप लेंढे, राजेश सोनटक्के, अनील ठोणे प्रामुख्खाने उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सुरेश बागडे, गिरीश राऊत, निखील भोयर, मुकेश ईंगळे, प्रकाश भोयर, नरेश बागडे, पिंन्टू यादव आदींनी परिश्रम घेतले.