नागपूर ब्यूरो: नागपूरसाठी 20 मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन एक टँकर सोमवारी सकाळी पोहोचला. हे टँकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रिकामा करण्यात आला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने तिसरे ऑक्सीजन टँकर नागपूरला प्राप्त झाले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष बसंतलाल शॉ, सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.