Home कोरोना Nagpur | 18 ते 44 वर्षे वयोगटाच्या नागरिकांचे बुधवारी लसीकरण होणार नाही

Nagpur | 18 ते 44 वर्षे वयोगटाच्या नागरिकांचे बुधवारी लसीकरण होणार नाही

45+ नागरिकांचे बुधवारी फक्त 3 केंद्रावर लसीकरण होणार

Photo: Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर ब्यूरो: नागपूर शहरात बुधवारी 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी कोणताही केंद्रांवर लसीकरण होणार नाही. तसेच शहरातील 45 वर्षावरील नागरिकांचे दुसरे डोज चे लसीकरण बुधवारी फक्त 3 केंद्रावर होणार आहे.

Photo: Moonlight Dharampeth Nagpur

यामध्ये स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि डॉ आंबेडकर रुग्णालय येथे कोव्हेक्सीन उपलब्ध राहणार आहे, ही माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. 45 वर्ष वरील व्यक्तींना दूसरे डोजच्या लसीकरणासाठी फक्त 3 केंद्रांवर ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल.

लसीकरण मोहिमेला युवक व युवतींकडून चांगला प्रतिसाद 

लसीकरण मोहिमेला युवक व युवतींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर ते लसीकरणानंतर फोटो आणि सेल्फी घेताना दिसत आहे. परंतु वारंवार लसीकरण बंद केल्याने त्यांचा उत्साह कमी होऊ शकतो.


नागपूरात लसीकरणाची

अद्यावत स्थिती ( 10 May 2021)


पहिला डोज :-

Photo: Moonlight Dharampeth Nagpur

आरोग्य सेवक         – 44259

फ्रंट लाईन वर्कर      – 49840

18 + वयोगट        –  10273

45 + वयोगट        – 109606

45 + कोमार्बिड     – 78034

60 + सर्व नागरिक  – 164573

पहिला डोज – एकूण : – 456585


दूसरा डोज :-

Photo: Moonlight Dharampeth Nagpur

आरोग्य सेवक        –  21468

फ्रंट लाईन वर्कर     –  14715

45 + वयोगट       –  18875

45 + कोमार्बिड    –  13123

60 + सर्व नागरिक –  58010


दूसरा डोज – एकूण – 126191

संपूर्ण लसीकरण एकूण:– 5,82,776