Home मराठी Helping Hands | ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन ने केली आॅनलाईन शिक्षणासाठी मदत

Helping Hands | ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन ने केली आॅनलाईन शिक्षणासाठी मदत

विद्यार्थिनीला भेट दिला मोबाईल

नागपूर ब्यूरो : करोना सारख्या जागतिक महामारी मुळे सर्वच लोकांचे नुकसान होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप जास्त शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील वर्षी आणि या वर्षी सुद्धा शाळा बंद आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लास साठी मोबाईल किंवा टॅब सारख्या सोई उपलब्ध नाही.

काही दिवसापूर्वी इशिका भाजे या विद्यार्थिनीने आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांना पत्र लिहिले त्यात ‘वडिलांचा रोजगार बंद झाला आहे, कमविण्याचे साधन बंद आहेत, घरात आम्ही दोन भावंडे असून कसेतरी तडजोड करून शिक्षण घेणे सुरू आहे, त्यातच इंटरनेट चा खर्च महिना 800 ते 1000 रु लागतो. आणि वडिलांचा रोजगार बंद असल्यामुळे आम्हाला हा खर्च परवडत नाही. त्यामुळे आॅनलाईन शिक्षण आम्हाला परवडन्या सारखे नाही, त्यामुळे शिक्षणासाठी आम्हाला परवडेल अशी उपाययोजना करावी किंवा शाळेला शक्य नसेल तर शासनाने तशी व्यवस्था करावी म्हणजे विद्यार्थ्यांचा आॅनलाईन शिक्षणाचा गंभीर प्रश्न सुटेल’ अश्या आशयाचे पत्र इशिकाने लिहिले होते.

इशिकाचे हे पत्र व्हायरल झाल्यावर ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन च्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांनी इशिकाच्या कुटुंबीय आणि श्री. सत्यसाई विद्या मंदिर शाळेशी संपर्क साधून इशिकाला अँड्रॉईड मोबाईल भेट दिला. व तिच्या पुढील आॅनलाइन शिक्षणाचा भार उचलण्याची ग्याही दिली. यावेळी ढवळे सर, निलेश सोनटक्के सर आणि इशिकाचे आजोबा उपस्थित होते.