नागपूर ब्यूरो: तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी हरीश कंगाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यानिमित्त मोर्चातर्फे कंगाली यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी जिल्हा महामंत्री अजय बोढारे, रामराज खडसे, तालुकाध्यक्ष सुनिल खोडे, आदर्श पटले, सचिन घोडे, दिनेश डोंगरे हे उपस्थित होते.