नवी दिल्ली ब्युरो : येणाऱ्या सात दिवसात तुमचं बँकेमध्ये जाण्यासंदर्भात काही महत्त्वाचं काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. दर महिन्याला साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त इतरही काही सुट्ट्या बँक कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगळ्या असतात. एखाद्या राज्यात एखाद्या सणसमारंभाची सुट्टी असेल तर ती सुट्टी दुसऱ्या राज्यात असेलच असं नाही. पुढील सात दिवसात जर तुम्ही बँकेत जाण्याची योजना आखत असाल तर आधी बँकेच्या सुट्ट्यांची यादी जरुर तपासा. जेणेकरून तुमच्या कामाचा खोळंबा होणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटनुसार या महिन्यातही देशातील वेगवेगळ्या राज्यात काही वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दरवर्षी वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जारी केली जाते. यामध्ये प्रत्येक महिन्यागणिक सुट्ट्या दिल्या जातात. सर्व राज्यातील सुट्ट्या या यादीमध्ये नमुद केल्या जातात. जेणेकरुन ग्राहक त्या दृष्टीने त्यांची बँकेत जाण्याची योजना आखतील आणि त्यांच्या कामाचा खोळंबा होणार नाही.
कोणत्या दिवशी बंद राहणार बँका?
RBI च्या मते, 12 जून रोजी महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. 13 जून रोजी रविवार असल्याने बँकांचं कामकाज होणार नाही. 14 जून रोजी सोमवारी बँका उघडल्यानंतर तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकता. दरम्यान 15 जून रोजी देशातील ठराविक ठिकाणी सुट्टी असणार आहे. 5 जून रोजी Y.M.A. डे मिथुन संक्रांति आणि रज पर्व आहे. ज्यामुळे मिझोरमच्या आयजोल, भुवनेश्वर याठिकाणी बँका बंद असणार आहेत. कारण हे सण केवळ याच राज्यात असतात. इतर राज्यांमध्ये बँकांचं कामकाज सुरळीत सुरू असेल.
येणाऱ्या दिवसात कधी असणार बँका बंद?
- 20 जून- रविवार
- 25 जून- गुरु हरगोविंदजी यांची जयंती (जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद)
- 26 जून- महिन्यातील चौथा शनिवार
- 27 जून- रविवार
- 30 जून- रेमना नी (आयजोलमध्ये बँक बंद)