Home मराठी महिला राज । नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा

महिला राज । नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा

नागपूर ब्यूरो : नागपूरच्या विभागीय आयुक्त पदी प्राजक्ता वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच विभागीय आयुक्तपदी महिला अधिकारी मिळाल्या आहेत.


सचिव पदी होत्या कार्यरत

प्राजक्ता वर्मा या मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. प्राजक्ता वर्मा या 2001 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

महत्वपूर्ण कार्य

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे 2003 मध्ये काम करीत असताना महात्मा फुले जलसंधारण अभियानात लोकसहभागातून वैजापूर पंचायत समितीला 17 लाखांचे पहिले बक्षीस मिळाले. 2009 मध्ये धुळे च्या जिल्हाधिकारी असताना “धवल भारती अभियान” राबवून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे म्हणून प्राजक्ता वर्मा यांनी खूप प्रयत्न केले. सिडको मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दहा गावांचे गावठाणा सह यशस्वी पुनर्वसन त्यांनी केले होते.