Home कोरोना Nagpur । कोरोनाच्या डेल्टा प्लसने धाकधूक वाढवली, आता वाचा नागपुरात काय बंद,...

Nagpur । कोरोनाच्या डेल्टा प्लसने धाकधूक वाढवली, आता वाचा नागपुरात काय बंद, काय सुरु?

नागपूर ब्युरो : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात डेल्टा प्लस प्रकाराची लागण झालेले 21 रुग्ण आढळून आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आहे. याला बघता राज्य शासनाने महत्वाचे निर्बंध लावले आहेत. नागपूर चे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुद्धा शुक्रवारी उशिरा नागपूर जिल्ह्याची परिस्थिती बघता नवा आदेश काढून निर्बंध लावले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा सदर आदेश 28 जुन च्या सकाळी 7 वाजे पासून तर 5 जुलै च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहील. आता वाचा नागपुरात काय बंद, काय सुरु?

नागपुरात असे असतील निर्बंध
  1. अत्याआवश्यक दुकाने दुपारी 4 वाजे पर्यंत (सोमवार ते रविवार)
  2. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजे पर्यंत खुले राहतील.
  3. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
  4. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के 4 वाजे पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.
  5. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. फक्त मेडिकल, महिला आणि अन्य अत्यावश्यक कामासाठी खुले.
  6. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल.
  7. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील.
  8. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील.
  9. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल.
  10. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
  11. लग्नसोहळे केवळ तीन तासांसाठी परवानगी. 4 वाजे पर्यंत 50 टक्के क्षमतेने किंवा 50 लोकं. (जे कमी असेल ते)
  12. अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. केवळ तीन तासांसाठी परवानगी.
  13. बांधकाम दुपारी 4 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
  14. 4 वाजे पर्यंत शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स नियमित प्रमाणे सुरु असेल.
  15. सायंकाळी 5 वाजे पर्यंत जमावबंदी आणि या नंतर संचारबंदी कायम राहील.

डेल्टा प्लसमुळे राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर द्वारे होणाऱ्या चाचण्यांचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तिसऱ्या लेवलपेक्षा कमी म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना मागील दोन आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीय असं दिसत असेल तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस या वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.