Home Maharashtra Happy Birthday | संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे एक झंझावात

Happy Birthday | संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे एक झंझावात

राष्ट्रवादी महिला काँग्रेस, जिल्हाध्यक्ष शाहीन बबलू हकीम यांनी उलगळले सुप्रिया सुळे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू


शाहीन बबलू हकीम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सुप्रीमो संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे  यांचे बुधवार, 30 जून रोजी वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुप्रिया सुळे यांचे चाहते तसे बरेच आहेत. मात्र महाराष्ट्राच्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील अहेरी तालुका मुख्यालयी राहणाऱ्या शाहीन बबलू हकीम यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस, जिल्हाध्यक्षा पद देऊन सुप्रिया सुळे यांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले आहे. शाहीन बबलू हकीम सुद्धा सुप्रिया ताईंच्या या उपकाराची परतफेड करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” शी बोलतांना ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगळण्याचे प्रयत्न केले आहे.

शाहीन बबलू हकीम म्हणतात, “:खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वभाव, साधी राहणी, पण उच्च विचारांचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार साहेब, यांच्या एकुलत्या एक कन्या असूनही कधी घरानेपणाचा घमेंड त्यांनी दाखविला नाही.

पक्षातंर्गत बैठका, चर्चा, मेळावे असले की, ताई अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या रांगेत बसतात. पक्षाचे प्रोटोकॉल ताईंकडून शिकण्यासारखे आहे. गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ताईंनी मुंबईच्या प्रदेश कार्यालया बाहेर रस्त्यावर बसून नेतेमंडळी व मान्यवरांचे भाषणे ऐकले. महाराष्ट्र राज्यासाठी तो योग्य आश्चर्यकारक होता.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तब्बल चार – पाचदा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला आहे. मागे एकदा तर “दे उभारी, घे भरारी”, या संकल्पनेतील युवती मेळाव्याच्या माध्यमाने जिल्ह्यातील युवतींशी मनमोकळेपणाने संवाद साधून युवती व प्रामुख्याने महिलांचे त्यांनी आत्मविश्वास वाढविले होते. सुप्रिया ताई महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परंपरेला सजेशयाच वागत असतात.

राजकीय क्षेत्रात महिला व मुली येण्यासाठी आधी मागे-पुढे करीत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खास युवती सेलची स्थापना करून राज्यभर जनजागृती व एक खंबीर व्यासपीठ तयार करून दिले. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे कोणत्याही व कुठल्याही अडी-अडचणीत स्वतः धावून जातात. मोठेपणाचा कुठलाही लवलेश न दाखविता अगदी वेळप्रसंगी रस्त्यावर बसून व्यथा ऐकून व समजून घेऊन वेळीच मार्गी लावण्यासाठी धडपडतात.

राज्याच्या नवनियुक्त आमदारांच्या आमदारकीच्या शपथ विधी सोहळ्यात सुप्रियाताई सुळे स्वतः प्रवेशद्वाराजवळ उभे राहून आदरातिथ्य व स्वागत आणि शुभेच्छा देते होते. विरोधकांनी टीकेची झोड उडविली, तरीपण ताईंनी विरोधकांच्या टीकेला न डगमगता आमदारांच्या या दिमाखदार शपथविधी सोहळ्याला एक वेगळा आनंद व महत्त्व प्राप्त करून दिले.

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रत्येक व दरवर्षीच्या वाढदिवशी चाहते व कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविले जाते. कोरोनाच्या प्रादूर्भावात मागील वर्षी ‘सावली’ या संकल्पनेतून सफाई कामगारांचा सन्मानपत्र देऊन राज्यभरात सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आले. ताई एक वेगळ्याच व्यक्तिमत्वाचे धनी असून त्या झंझावात आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी ताईंचे आरोग्य निरोगी, सुदृढ व बळकट राहो त्यांच्या वाढदिवसानिम्मित्त संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा ! “